पिंपरी -चिंचवड ७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच येत आहे.पुण्याच्या पिंपळे निलख येथील क्षितीज प्रेस्टन वुड्स या गृहनिर्माण सोसायटी मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे.दरम्यान या सोसायटीमधील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय युवक स्वप्नील शिवशरण पवार यांने सोसायटी मधील एकूण १३ वाहने पेटवून दिली आहे.दरम्यान या झालेल्या घटनेत सोसायटी मधील रहिवाशांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान सदर घटनेनंतर सांगवी पोलिसांनी 👮 स्वप्नील याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान या घटनेची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ५ मार्च रोजी बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्वप्नील यांने सोसायटी मध्ये पार्किंग केलेल्या वाहनांना ज्वलनशील पदार्थचा वापर करून एकूण १३ वाहनं पेटवून दिली.सदर आगीत अनेक वाहने जळाली याप्रकरणी सोसायटी मधील रहिवासी नेमीनाथ भानुदास जामगे (वय ६२) यांनी सांगवी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने स्वप्नील पवार याला अटक केली आहे.याप्रकरणी पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.