पुणे दिनांक ७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बुलढाणा जिल्ह्यातून आली आहे.भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याचे नव नवीन व्हिडिओ आता पुढे येत आहेत.या व्हिडिओ मध्ये त्याचे कारनामे देखील आता व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान खोक्याने शेकडो हरीण.काळवीट.मोर.ससे. मारल्याचा मोठा आरोप केला जात आहे.याच्यावर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व 👮 पोलिसांनी कोणतीही प्रकारची कारवाई त्याला असलेल्या राजकीय बळामुळे केली नाही.असा देखील आरोप आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.यातच खोक्याला हरीण पकडण्यास विरोध केल्याने त्यांने शिरूर तालुक्यातील बाप आणि लेकाला हाडे मोडूसतर प्रचंड मारहाण केली आहे. दरम्यान या नंतर दिलीप ढाकणे व त्यांचा मुलगा महेश यांच्यावर खोक्याच्या सांगण्यावरून एका महिलेने खोटे गुन्हे दाखल केले आहे.दरम्यान खोक्या याच्या विरोधात ढाकणे यांनी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी 👮 त्यांची फिर्याद घेतली नाही.मात्र खोकल्याच्या सांगण्यावरून या महिलेची फिर्याद पोलिसांनी तातडीने घेतली आहे.अशी आपबिती पिता -पुत्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे.