पुणे दिनांक ८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कोयता गॅंगच्या विरोधात पुणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे पोलिसांनी कडक मोहिम उघडली.त्यांची त्याच भागात हातात हातकड्या घालून घटनास्थळावरुन धिंड काढली तरी पुण्यातील कोयता गॅंगचा शहरात धुमाकूळ वाढतच चालला आहे. तो कमी होण्याचे नाव घेत नाही.दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील सिंहगड रोडवरील भागात पुन्हा एक घटना घडली आहे.कामावरुन मोटार सायकल वरून घरी जाणा-या नवरा बायको यांच्यावर शिल्लक कारणांवरून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान या घटनेची पोलिसांनी 👮 दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी सायंकाळी सिंहगड रोड वरील भागात एक धक्कादायक घटना घडली आहे.कामावरुन घरी मोटार सायकल वरून जाणाऱ्या नवरा बायको यांचा काही युवकांबरोबर वाद झाला.सदर वादानंतर त्या युवकानी या नवरा बायकोला शिवीगाळ करून आणि कोयत्याने हल्ला केला आहे.यात नवरा जखमी झाला आहे.सदर घटना ही सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाजवळ घडली आहे.हल्ला करुन गाडीवरून हल्लेखोर हे फरार झाले आहेत.दरम्यान सदरच्या हल्ल्यानंतर या बाबत सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून.आता या कोयता गॅंगचा शोध सिंहगड रोड पोलिस घेत आहेत.दरम्यान या हल्ल्या नंतर सिंहगड रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.