Homeक्राईमपुण्यात दारुची नशा रस्त्यावर, मोठ्या बापाच्या मुलाचा पैशाचा माज, तरुणांची महिला समोर...
पुण्यात दारुची नशा रस्त्यावर, मोठ्या बापाच्या मुलाचा पैशाचा माज, तरुणांची महिला समोर फुटपाथवर लघुशंका, कायदा फक्त गरीबांना पैशाची मस्ती वाल्यांना कायदा नाही?
पुणे दिनांक ८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर येथून आली आहे.दारुची नशा.पैशाचा माज! पुण्यात मद्यधुंद युवका ने भर रस्त्यावर अश्लील चाळे करुन महिला समोरच फुटपाथवर केली लघुशंका दरम्यान ही घटना आज सकाळी घडली आहे.
दरम्यान सदर घटनेची माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे.पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात पुणे ते नगर रोडवरील हा प्रकार घडला आहे.बड्या बाप्पाची औलाद असणारे दोघेजण मद्यधुंद अवस्थेत BMW कार मधून उतरुन नेहमी गजबजलेला रस्त्यावर मधोमध कार उभी करून कार मधून उतरुन फुटपाथवर एका महिले समोरच लघुशंका करून अश्लील चाळे आज महिला दिनाच्या दिवशीच केल्या मुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान दुसरा युवक कारमध्ये बसला होता त्याच्या हातात मद्याची बाटली होती.तसेच दोघेजण मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करत होते. या वेळी सकाळी या लोकांना या बाबत नागरिकांनी जाब विचारला असताना हे फुल वेगानं कार चालवत वाघोलीच्या दिशेने पळून गेले आहेत.दरम्यान पुण्यात पोर्शे कार दुर्घटना नंतर पोलिसांनी बड्या बापाला आईला व मुलावर कारवाई केल्यानंतर पुण्यात पुन्हा BMW कार मध्ये मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजीचा आज प्रकार घडला आहे.पुण्यात पब हे पहाटे प्रर्यत सुरू आहे.त्यामुळे अशा घटना घडत आहेत.कमीत कमी पुणे पोलिसांनी आज महिला दिनाच्या दिवशी तरी हे पब बंद कराव्यात.यातील युवकांना पहाटेच्या सुमारास दारु कुठून मिळाली याचा शोध पोलिसांनी 👮 घ्यावा अद्याप ही घटना घडून बराच वेळ होऊनही पोलिसांनी कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही.