पुणे दिनांक ८मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड जिल्ह्यातून येत आहे.भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या विरोधात उद्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार बंदची हाक देण्यात आली आहे.आता खोक्या चा बोक्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली आहे.तसेच आता यात अनेकांनी तशी मागणीच बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्याकडे मागणी केली आहे.दरम्यान सतीश भोसले यांने मोर.ससा.हारीण.तसेच काळवीट यांची शिकार केली आहे.अशी माहिती समोर येत आहे.दरम्यान माध्यामांवर मोठ्या प्रमाणावर न्यूज आल्यानंतर इतके दिवस झोपलेल्या वन खात्याला आज अखेर जाग आली आहे.त्यांनी आज सतीश भोसले याच्या घरी जाऊन त्याच्या घरामधून प्राण्यांचे वाळलेले मांस जप्त करण्यात आले आहे.तसेच प्राण्यांना पकडण्यासाठी असलेले जाळं.हे जप्त करण्यात आले आहे.दरम्यान त्याच्या घरात मोठ मोठे सत्तूर देखील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे.दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या हा हे त्याचे सर्व पराक्रम मिडियावर आल्यानंतर व पोलिस आता आपल्या मागावर आहेत.अशी त्याला खात्री झाल्यावर तो फरार झाला आहे.दरम्यान बीड जिल्हा गुन्हे शाखेच्या दोन टीम त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्या असून तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.दरम्यान आता सतीश भोसले उर्फ खोक्या मुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाल्यास आश्र्चर्य वाटू नये.