पुणे दिनांक ८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड जिल्ह्यातून आली आहे.दरम्यान बीड जिल्ह्यातील ही न्यूज असून धक्कादायक आहे.आज महिला दिन सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असताना आजच्या दिवशीच पोलिस कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.उध्दव गडकर असे या नराधम पोलिसाचे नाव आहे.त्याला अटक करण्यात आली आहे.बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनेच पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलची ओळख करत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.दरम्यान आता महायुतीच्या सरकारच्या काळात पोलिस हे सर्व सामान्य जनतेचे रक्षणकर्ते असताना ते आता भक्षक झाले असल्याचे या प्रकरणावरून दिसून आले आहे. आता सर्व सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.