पुणे दिनांक ९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील येरवडा येथील शास्त्री नगर येथील मेन रोडवर BMW उभी करून फुटपाथवर महिला समोर महिलादिनी लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजासह BMW कार मध्ये दारु पिणारा त्याचा मित्र भाग्येश अग्रवाल याच्या देखील येरवडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान भाग्येश अग्रवाल याला काल रात्री येरवडा पोलिस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांच्या जिवलग मित्रांनी त्याला खाण्यासाठी पार्सल मागविण्यात आले आहे.अशी धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यात कोल्ड कॉफी.बर्गर.तसेच कोल्ड्रिंक्स त्याचे मित्र चक्क येरवडा पोलिस स्टेशन मध्ये घेऊन आले.दरम्यान यावेळी पत्रकार पोलिस स्टेशन मध्ये उपस्थित असल्यामुळे पोलिसांनी 👮 त्या मित्राची हकालपट्टी केली आहे.एवढं होऊन देखील या बेवड्याचा माज कायम आहे.