पुणे दिनांक ९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ८ मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे ३.००० जमा होतील,अशी माहिती महायुतीच्या सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाच्या कॅबिनेट महिला व बालकल्याण बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती.मात्र तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात एकच हप्ता जमा झाला आहे फक्त १५००.म्हणजे काय तर महिला विकास बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी फक्त एकच हप्ता खात्यात जमा करून महिलादिनी महिला मंत्री यांनी बोळवण केली आहे.तसेच निवडणुकांपूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात २ हजार १०० रुपये जमा करु असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.पण सरकार येताच तो एक जुमला होता अशी टीका आता विरोधक महायुती सरकारवर करत आहेत.तर २ हजार १०० रुपये आमचे सरकार सत्तेवर आले तर देऊ हे फक्त निवडणूक पुरतं आश्वासन होते.आता हे एकंदरीत सिध्द झाले आहे.आता लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.यावर आता १२ मार्च पर्यंत महिलांच्या खात्यात दोन्ही महिन्यांचे ३.००० रुपये जमा होतील, अशी माहिती महिला बालकल्याण व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.