पुणे दिनांक १० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल सामना मध्ये भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव करुन चॅम्पियन ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.याबाबत राष्ट्रपतींनी त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करण्यात आली आहे.” भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन.तीन वेळा ट्राॅफी जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरला. क्रिकेट इतिहास रचल्या बद्दल खेळाडू व व्यवस्थापन तसेच सपोर्ट स्टाफ सर्वोच्च कौतुकास पात्र आहेत. भारतीय क्रिकेटला उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते”,अशा त्या म्हणाल्या आहेत.