मुंबई दिनांक १० मार्च( थेट मंत्रालयातूनपोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महायुतीच्या सरकारचा २०२५ ते २६ चा वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला जात आहे.उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सदनात मांडत आहेत.आजच्या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार? शेतकरी वर्गाकरिता कोणती घोषणा करण्यात येणार.तसेच लाडकी बहीण योजनेच वाढीव हप्त्याची घोषणा होणार का? यासर्व गोष्टीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.नागपूर मध्ये अर्बन हाटची स्थापना होणार.वीज खरेदीत १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल.मुंबई महानगरची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डाॅलर्स पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.एकूण निर्यातीत राज्याचे धोरण २०२५ लवकरच जाहीर होणार आहे.राज्यात ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट.
विमान चालन रेल्वे.मेट्रो . महामार्ग.जलवाहतूक .बंदर विकास.सिंचन.उर्जा.या क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक करणार.उद्योग विभागाला १ हजार २१ कोटी.तसेच कामगार विभागास १७१ कोटी.वस्त्रोद्योग विभागास ७७४ कोटी तर कौशल्य.रोजगार.उद्योजकता.व नावीन्य विभागास ८०७ कोटींचा निधी.नव्या उद्योगा साठी १४१ सुविधा ‘मैत्री’ अंतर्गत एकाच ठिकाणी उपलब्ध.तसेच मुंबईत तिसरं विमानतळ वाढवण बंदरा जवळ गेटवे ते मांडवा जलवाहतूकीसाठी अत्याधुनिक बोटी.सिंधुदुर्गातील देवबाग मध्ये सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प.अमुतकाल राज्य रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित.रस्ते विकास प्रकल्पाचा टप्पा एक पुर्ण.दुस-या टप्प्यातील ३५० किमी रस्त्याचे काम पूर्ण. तसेच तिसऱ्या टप्प्यातील साडे सहा हजार कोटींचे कामे हाती.२०२५ -२६ मध्ये दीड हजार किमी रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट.MMR क्षेत्र ग्रोथ सेंटर म्हणून विकसित करणार.गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्या साठी ५०० कोटी रुपयांची तरतूद.राज्यातील विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील.राज्याला वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करणार तसेच राज्यात ७ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे उभारणार.मायक्रोसाॅफ्ट कंपनी मार्फत १० हजार महिलांना प्रशिक्षण.पायाभूत सुविधांसाठी ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक.पर्यटनाला बंदर करातून सूट. महाराष्ट्र आता थांबणार नाही.तसेच विकास देखील लांबणार नाही.मतदांराचा विश्र्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक.तसेच गुंतवणूक येत असल्याने राज्यात रोजगार वाढतोय.तसेच परकीय गुंतवणूकीमुळे राज्यात १६ लाख रोजगारांची निर्मिती.औद्योगिक विकासात महाराष्ट्र अव्वल.राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल.आम्हाला त्याचा सार्थ विश्वास आहे.असे अजित पवार यांनी म्हटले आहे.