पुणे दिनांक ११ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन येत असून.दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पुणे येथील स्वारगेट येथील एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये २६ वर्षीय युवतीवर बलात्कार करण्यात आला होता.सदरच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.व याचे पडसाद हे मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील विरोधकांनी सरकारला घेरले होते.याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बाबत चौकशीचे आदेश दिले होते.दरम्यान यातील सुरक्षा रक्षकांना देखील निलंबित करण्यात आले होते.तसेच अन्य अधिकारी यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.यात चार एसटी महामंडळाचे अधिकारी या प्रकरणी दोषी अढाळून आल्यानंतर आज सदनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे चार अधिकारी यांना निलंबित केल्या बद्दल विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना सांगितले आहे.