पुणे दिनांक ११ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यातील सुशिक्षित असा भाग असलेल्या सदाशिव पेठेत किरकोळ वादातून १० ते १५ जणांच्या टोळक्याने दोन जणांवर कोयत्याने हल्ला करुन गंभीर रित्या जखमी केले आहेत . यातील एक जणांची प्रकृती चिंताजनक असून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.दरम्यान हल्ला केल्यानंतर हल्लेखोर हे हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान या हल्ल्यानंतर सुशिक्षित अशा सदाशिव पेठेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान सदर घटनेबाबत खडक पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार यातील जखमी अक्षय वाघ (वय २६ रा.आंबेगाव पठार पुणे) हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट 🏏 सामना पाहण्यासाठी चिमण्या गणपती चौकात आला होता.दरम्यान सामना संपल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास घरी जात असताना त्याचा दोंघा बरोबर वाद झाला दरम्यान वाद विकोपाला जाण्यापूर्वी त्याच्या मित्राने भांडण मिटवले.त्यानंतर संबंधित दोन जणांनी १२ ते १३ त्यांच्या मित्रांना बोलवले त्यांनी अक्षय याच्यावर कोयत्याने हल्ला केला.यात अक्षय गंभीर रित्या जखमी झाला आहे.त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रावर देखील हल्ला करण्यात आला आहे. व यावेळी हल्लेखोरांनी हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान जखमी अक्षय याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या बाबत खडक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या भागातील CCTV फुटेजची पहाणी पोलिसांनी केली आहे.दरम्यान या हल्ल्यानंतर सुशिक्षित अशा सदाशिव पेठेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.व पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच आहे.दरम्यान अशा घटनेनंतर या भागातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आता निर्माण झालेली आहे.दरम्यान पोलिसांनी 👮 या कोयता गॅंगचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.