पुणे दिनांक ११ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन येत असून.समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले होते. या बाबत धार्मिक भावना दुखावल्या बाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.न्यायालयाने त्यांना २० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.तसेत दिनांक १२ व १३ तसेच मार्च मध्ये पोलिस अधिकारी यांच्याकडे हजर रहावे.असे सांगण्यात आले आहे. तसेच अधिवेशन कालावधीत आझमी यांनी केलेल्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणामुळे सदनात अनेक विरोधक व सत्ताधारी आमदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यामुळे अधिवेशन कालावधीत त्यांना सदनातून अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते.व तसेच त्यांच्यावर समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.