पुणे दिनांक १२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे येथूनच आली आहे.पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेंला पुण्यातील येरवडा कारागृहातून सांगलीच्या कारागृहात पोलिस बंदोबस्तात हलवले आहे.दरम्यान आता सांगलीच्या कारागृहाचा पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.दरम्यान पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका मारहाण करण्यात आली होती.नंतर पुणे पोलिसांनी 👮 गजा मारणेंला अटक करुन त्याच्यावर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान पुणे येथील येरवडा कारागृहातून गजा मारणेला सांगलीच्या कारागृहात का हलवले? यांचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
दरम्यान गजा मारणेला सांगलीच्या कारागृहात रवानगी केल्यानंतर तेथील कारागृहाची सुरक्षा रक्षक वाढवली आहे.दरम्यान सांगलीच्या कारागृहाच्या प्रशासनाच्या वतीने याबाबत गोपीनीयता बाळगलेली आहे.दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून कुख्यात गुंड गजा मारणेला पुण्यातील येरवडा कारागृहातून सांगलीच्या कारागृहात रवानगी केली आहे.अशी याबाबत खात्रीशीर सूत्रां कडून माहिती मिळत आहे.दरम्यान सांगलीच्या कारागृहात ज्या बॅरॅक मध्ये गजा मारणेला ठेवण्यात आले आहे.त्या बॅरॅकच्या बाहेर जेल प्रशासनाच्या वतीने कडक असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.व कारागृह प्रशासन अलर्ट मोडवर असून तसेच कारागृहातील सर्व वाॅट्स टाॅवरवर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.