पुणे दिनांक १२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून खळबळ जनक अपडेट आली असून.भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा जिवलग कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या आज बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथून मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान खोक्याचा शोध बीड जिल्हा क्राईम ब्रॅचच्या दोन टीम शोध घेत होत्या.दरम्यान खोक्या हा पोलिसांना सापडत नव्हता.पण तो माध्यमांना तो मुलाखती देत होता.त्यामुळे विरोधकांकडून महायुती सरकारवर व विशेष करून गृहखात्यावर टीका होत होती.दरम्यान खोक्यावर शिरुर कासार पोलिस स्टेशन मध्ये एकूण आता तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.तर खोक्या हा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या समवेत बुलटवर बसलेला आहे.तसेच तो त्यांचा जिवलग कार्यकर्ता आहे.त्यामुळे आता आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.