पुणे दिनांक १३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून आली आहे.पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील दानेवाडी गावाच्या हद्दीत घोडनदीत एक युवकाचा मृतदेह आढळला आहे.दरम्यान अंत्यत निर्घृणपणे व अमानुषपणे या युवकाची हत्या करण्यात आली आहे.सदर युवकाचा मृतदेह अज्ञात व्यक्तीने या नदीच्या पात्रात टाकला आहे.या युवकाचे मुंडकं छाटून हातापायाची खांडोळी करून सदरचा मृतदेह आढळला आहे.दरम्यान सदरचा मृतदेह आढळल्यानंतर या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.व एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहिती नुसार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पोलिस स्टेशन मध्ये ९ मार्च रोजी माऊली सतीश गव्हाणे (वय.१९ ) हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. सदरचा युवक हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडीचा रहिवासी आहे .तो शिरूर येथील सीटी बोरा महाविद्यालयात १२वीत शिकत होता त्याची परिक्षा सुरू होती.दरम्यान ९ मार्च रोजी तो अचानकपणे बेपत्ता झाला.त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान अचानकपणे दिनांक १२ मार्च रोजी दानेवाडी गावाच्या हद्दीत नदीपात्राच्या शेजारी असलेल्या एका विहिरीत अनोळखी युवकाचे प्रेत पोत्यात भरलेल्या स्थितीत सापडले यात प्रेताचे मुंडकं धडापासून छाटलेले व तसेच दोन्ही हात व दोन्ही पाय छाटून खांडोळी केलेला असा मृतदेह पोत्यात होता.दरम्यान सदरचा मृतदेह हा बेपत्ता झालेल्या माऊलीचा आहे. असा अंदाज अनेकांनी व्यक्त केल्यानंतर त्याचे पालक व नातेवाईक शिरुर पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले. व त्यांनी मृतांची ओळख पटवून तो मृतदेह हा बेपत्ता झालेल्या माऊलीचा आहे असे सांगितले.त्यामुळे आता गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे .तर या घटनेनंतर अहिल्यानगर व पुणे ग्रामीण पोलिसांची पथके आता तपासाचे काम करत आहेत.दरम्यान शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.