पुणे दिनांक १४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यातील कात्रज व आंबेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहनांची तोडफोड.तसेच दंगा व हाणामारी करणाऱ्या व या भागात दहशतीचे वातावरण निर्माण करणा-या गुंडांची कात्रज व संतोष नगर मुख्य रोडवर होळीच्या दिवशीच आंबेगाव पोलिसांनी 👮 चांगलीच धिंड काढली आहे.दरम्यान सदरच्या धिंड बाबत या भागातील नागरिकांनी यावेळी पोलिसांच्या कारवाईनंतर समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान आंबेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांनी या भागात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.यांना आज धुलीवंदनाच्या दिवशीच पोलिसां नी धिंड काढून चांगलाच धडा शिकवला आहे.आज या सर्व गुंडांची आंबेगाव पोलिसांनी 👮 कात्रज.संतोष नगर.सच्चाईमाता चौक.भगवा चौक.हनुमाननगर .शनीनगर.जांभुळवाडी रस्ता.पाण्याची टाकी चौक. या भागातून पायी धिंड काढली आहे.दरम्यान यावेळी सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने.सहाय्यक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे.प्रियंका गोरे.पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर.व आंबेगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान यातील गुन्हेगारांनी बुधवारी गुन्हा केल्यानंतर त्यांच्यावर गुरुवारी कारवाई करुन आज धिंड काढण्यात आली आहे.सदरच्या गुन्हेगारांवर सिंहगड रोड पोलिस स्टेशन.भारती विद्या पीठ पोलिस स्टेशन.तसेच आंबेगाव पोलिस स्टेशन पूर्वीपासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने म्हटले आहे.