पुणे दिनांक १४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील न्यायालयात त्याला हजार त्याला हजर करण्यात आले आहे.दरम्यान खोक्या भोसले याला गुरुवारी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथील विमानतळावर त्याला बीड गुन्हे शाखेचे पोलिस व उत्तर प्रदेश येथील पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई करुन त्याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान त्याला काल प्रयागराज येथील न्यायालयात हजर करुन ट्रेझ्निट रिमार्ड घेतल्या नंतर त्याला आज बीड येथे आणण्यात आले आहे.व नंतर त्याची शासकीय रुग्णालयात मेडिकल करुन त्याला आता थोड्याच वेळापूर्वी शिरुर कासार येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या विरोधात शिरुर कासार पोलिस स्टेशन मध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. यातील एक गुन्हा हा वन विभागाच्या वतीने स्वंतत्र रित्या दाखल करण्यात आला आहे.पोलिस हे न्यायालयात खोक्या भोसलेची १४ दिवसांची पोलिस कस्टडी मागणार आहेत.थोड्याच वेळात आता स्पष्ट होईल की न्यायालयाने त्याला किती दिवसांची कस्टडी दिली आहे.