पुणे दिनांक १४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळीच एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून आली आहे.पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.तसेच पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही.सोसायटी मधील वाहनांची कोयत्याच्या सहाय्याने तोडफोड.असे सरस प्रकार सुरू आहेत. अशातच पुण्यातील वानवडी भागात असणाऱ्या जगताप चौकातील अलिशान सोसायटी मध्ये ४ ते ५ अज्ञात इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांनी हातात तलवारी घेऊन सोसायटी मध्ये आत शिरले पण श्र्वानांने त्यांना दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा कुत्रा 🐕 जोर जोराने भुंकू लागला व या दरोडेखोरांना श्र्वानांमुळे दरोडा न टाकता आल्या पावली हात ✋ हालवत जावा लागले आहे.तसेच श्र्वानांमुळे दरोडेखोर सोसायटी मधून पळून गेले आहेत.हा सर्व प्रकार सोसायटी मध्ये असलेल्या CCTV कॅमेरा 📷 मध्ये कैद झाला आहे.दरम्यान या श्र्वानांमुळे मोठ्या दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. याची चर्चा या सोसायटीत आहे.