पुणे दिनांक १४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आली आहे.पूर्व वैमनस्यातून अहिल्या नगर रोडवरील वाडेबोल्हाई भागात पिस्तूल मधून काल मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. तर एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे.दरम्यान गोळीबाराची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी 👮 तातडीने घटनास्थळी दाखल होऊन दोन जणांना गजाआड केले आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावे १) गणेश संजय चौधरी (वय २९) २) ओंकार अंकुश लांडगे (वय २५ रा.दोघे.वाडेबोल्हाई पुणे) अशी आहेत.दरम्यान या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वाडेबोल्हाई येथील रस्त्यावर यातील फिर्यादी अजित महादेव जाधव व आरोपी गणेश चौधरी यांच्यात वाद झाला त्यावेळी अजित यांने गणेश यांच्यात झालेल्या वादा नंतर हा वाद मिटविण्यासाठी गणेश आणि अजित त्यांचे मित्र घेऊन या भागात आला होता.दरम्यान रात्री पुन्हा त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले.त्याचवेळी वाडेबोल्हाई मंदीरापासून चारजण आले व त्यांनी पिस्तूल मधून गोळीबार केला.दरम्यान गोळीबाराचा आवाज आल्याने दोघांचे मित्र पळून गेले.दरम्यान जाधव यांचा मित्र जुनैद शेख दुचाकीवर थांबला होता. त्यावेळी त्याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे.दरम्यान येथील गोळीबाराची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी 👮 तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आरोपी गणेश व त्याचा साथीदार ओंकार यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.