पुणे दिनांक १५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) देहूत तुकाराम महाराज बीज सोहळा मोठ्या उत्साहात दरवर्षी होत असतो.तसेच या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी लाखोंच्या संख्येने येत असतात.दरम्यान श्रद्धेपोटी वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात व नदीचे पाणी पितात.दरम्यान आता या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने म्हत्वाचे आदेश जारी करण्यात आले आहे.ज्यामध्ये आता वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.असे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
दरम्यान १४ ते १६ मार्च दरम्यान बीज सोहळा मोठ्या उत्साहाने देहूत होत असतो या करिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लाखोंचे संख्येने वारकरी या सोहळ्याला उपस्थित राहतात.दरम्यान सोहळ्याला येणाऱ्या लाखो वारकरी यावेळी इंद्रायणी नदीत स्नान करून नदीतील पाण्याला पवित्र मानून पितात .मात्र काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची मोठ्या प्रमाणावर साथ ही दुषीत पाण्यामुळे सुरू आहे.त्यामुळे इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व स्वयंपाक करण्यासाठी वापरण्याकरीता आता बंदी घालण्यात आली आहे.नदीच्या तीरावरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाक करण्यासाठी योग्य नसल्याने वारकऱ्यांनी उपलब्ध नळाच्या पाण्याचा वापर करावा असा आदेश देण्यात आला आहे.