Home क्राईम बीड जिल्हा पुन्हा हादरला… आष्टीत सलग दोन दिवस मारहाण करून हत्या, तरुणाच्या...

    बीड जिल्हा पुन्हा हादरला… आष्टीत सलग दोन दिवस मारहाण करून हत्या, तरुणाच्या हत्याचे फोटो आले समोर

    163
    0

    पुणे दिनांक १६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड जिल्ह्यातून आली आहे.दरम्यान मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या नंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा चांगलाच हादरला आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे प्रेम प्रकरणातून एका युवकाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.दरम्यान हत्या झालेल्या युवकाचे नाव विकास बनसोडे (वय २५ ) असं आहे.दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलिसांनी 👮 भाऊसाहेब क्षिरसागर याला पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान विकास याचे मालकाच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते.व ते दोघेजण शेतात मालकाला सापडले होते.त्यानंतर  क्षिरसागरने विकासला एका खोलीत डांबून ठेवत दोन दिवस बेदम मारहाण केली.

    दरम्यान विकास बनसोडे हा क्षिरसागर यांच्याकडे चार वर्षांपासून ट्रक ड्रायव्हर म्हणून कामास होता.त्याला मारहाण केलेले  फोटो समोर आले आहे.दरम्यान सदर फोटो मध्ये त्याच्या हातावर व पाठीवर मारहाणीचे काळे वण दिसत आहे.दरम्यान त्याला दोन दिवस एका खोलीत मारहाण करण्यात आली होती.व यातच त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान विकास याला बेदम मारहाण केल्यानंतर त्याचा मालक क्षिरसागर यांनी विकास याच्या घरी फोन करून त्यांना कल्पना दिली पण मारहाणीत विकास याचा मृत्यू झाला होता. दरम्यान बीड जिल्ह्यात हत्या व हाणामारीचे सत्र सुरूच आहे.दरम्यान विकास याचा प्रेम प्रकरणातून खून केल्यानंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा चांगलाच हादरला आहे.

    Previous article‘खोक्या भोसलेचं घर जाळण्याची घाई का ‘? सुरेश धस घेणार खोक्याच्या कुटुंबायांची भेट
    Next articleमहाराष्ट्रात व देशातभरात शिवजयंतीचा उत्साह,ठिक ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here