पुणे दिनांक १७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज सोमवारी तिथीनुसार जयंती आहे.त्यानिमित्त राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पहायला मिळत आहे.राज्याभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तर आजच तिकडे संभाजीनगरमध्ये शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीवर चाल करून जात बाबरी करण्याचा इशारा बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटना यांनी दिला आहे.त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
निधड्या छातीचा, दणकट कणांचा,मराठी मनाचा, व भारत भूमीचा एकच राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती.व शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा , स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण.देशाला आहे त्यांचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून या गोष्टी शिका… लीडरशीप. व्यवस्थापन.आत्मविश्र्वास.टीमवर्क.दूरदृष्टी . टाइम मॅनेजमेंट.योग्य सहका-यांची निवड.दीर्घकालीन विचार शांततेने निर्णय.छोटी सुरुवात.