पुणे दिनांक १७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून आली आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील महालमध्ये दोन गटात तुफान दगडफेक झाली या वेळी संतप्त झालेल्या दोन गटातील लोकांनी वाहने पेटवली आहे.तसेच या दगडफेकीत बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले असून घटनास्थळी आता मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान यावेळी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांडे फोडण्यात आल्या आहेत.तसेच वाहने पेटवली ती विझवण्या साठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.दगडफेकीत ३ ते ४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.