पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील हिंजवडी येथील फेज वन मध्ये आज सकाळी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना कंपनीत घेऊन जाणा-या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आहे.दरम्यान सदरच्या आगीत होरपळून चार कामगारांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.दरम्यान या आगीत टेम्पो ट्रॅव्हल्सचा आगीत जळून फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे.तर अन्य कामगार या आगीतून बचावले आहेत
दरम्यान आज सकाळी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कामगारांना कंपनीत घेऊन जाणा-या टेम्पो ट्रॅव्हल्सचा बसला हिंजवडी फेज वन येथे अचानकपणे 🔥 आग लागली.दरम्यान या बसमध्ये एकूण १२ कर्मचारी होते. यातील आठ कर्मचारी हे आग लागताच तातडीने बाहेर पडले पण पाठीमागे बसलेले चार कर्मचारी हे दरवाजा लाॅक झाल्यामुळे होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व व रुग्णवाहिकेतून घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान अचानकपणे या टेप्मो ट्रॅव्हल्स बसला आग कशी लागली हे समजू शकलेले नाही.दरम्यान यात अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारा करीता तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.