पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही छत्तीसगड येथून आली आहे.दरम्यान छत्तीसगड येथील दंतेवाडा येथे सुरक्षा रक्षक व पोलिसांनी 👮 संयुक्त रित्या केलेल्या कारवाईत एकूण २२ नक्षलवादी ठार केले आहे.दरम्यान या झालेल्या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला आहे.दरम्यान चकमक झालेल्या घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.दंतेवाडा- विजापूर सीमेवरील गंगलूर भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 👮 व सुरक्षा रक्षक यांनी तातडीने संयुक्त रित्या कारवाई केली आहे.