पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबई वरुन एक अपडेट येत असून. महाराष्ट्रातील जेष्ठ शिल्पकार राम सुतारांना आज विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.तशी घोषणाच अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी केली आहे.दरम्यान आपल्या शिल्पकलेच्या माध्यमा मधून त्यांनी अनेक सुंदर कलाकृतींची निर्मिती केली आहे.’ स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळाही त्यांच्याच कलेतून साकरला गेला आहे.आपल्या कलेतून त्यांनी मूर्तींमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम केले.