पिंपरी चिंचवड २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही मुंबई वरुन थेट मंत्रालयातून आली आहे.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस उप-आयुक्त , परिमंडळ दोन सह , इतर अनुषंगिक कार्यालय तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी वाकड येथे १५ एकर जागेच्या भूसंपादनास आज गुरुवारी राज्य शासनाच्यावतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे एकदम अल्पावधीतच हा प्रश्न मार्गी लागला असून दरम्यान त्या संबंधीचा शासननिर्णय आज मंत्रालयात निर्गमित झाला आहे.