Home आरोग्य पुण्यात आधी दुषीत पाण्यामुळे आता डासांमुळे त्रस्त,डासांना पळवून लावा व कुटुंबाचे संरक्षण...

    पुण्यात आधी दुषीत पाण्यामुळे आता डासांमुळे त्रस्त,डासांना पळवून लावा व कुटुंबाचे संरक्षण कारा पुण्याच्या आरोग्य विभागालाच झाला डेंग्यू?

    90
    0

    पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही आरोग्याच्या दृष्टीने येत आहे.पुण्यातील मुळा नदी ही गेल्या दोन दिवसां पासून फेसळली आहे.तसेच त्यात जलपर्णी असल्याने व सर्व केमीकल कंपन्यांचे दुषित पाणी यामुळे पुण्या मधील सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर दुसरीकडे डासांचा देखील मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढतच आहे.तर मुंढवा केशवनगर पाण्यात हायसिंथच्या वाढीमुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर व झपाट्याने वाढत आहे.यातूनच आता नागरिकांना डेंग्यू.मलेरियाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे पुणे महापालिकेच्या वतीने नदी मधील जलपर्णी काढून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी केली आहे,

    दरम्यान आता पुण्यात डेंग्यू.मलेरिया या आजाराने पुणेकर नागरिक चांगलेच त्रासले आहेत.पुण्यातील अनेक रुग्णालयात या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत.त्यामुळे आता पुणे महानगरपालिका असून ओळंबा नसून खोळंबा असा प्रकार सुरू आहे.कारण या महानगरपालिका मध्ये निवडणूका नसल्याने लोक प्रतिनिधीच नाही.सर्व काम प्रशासनाच्या हातात त्या मुळे पुण्यात सर्वत्रच महानगरपालिकेच्या काम हे रामभरोसेपणे सुरू आहे.त्यामुळे डेंग्यू व मलेरिया या सारख्या आजारांपासून कुटूंबाचे संरक्षण करायचे असेल तर डासांना आपल्या घराच्या अवतीभोवती फिरकू देऊ नका व स्वच्छता राखा व स्वताच्या कुटुंबाचे डासांपासून संरक्षण कारा.घराच्या बाहेर असलेल्या कुंड्या मधील पाणी तसेच फुलदाणी मधील पाणी स्वच्छ ठेवा.महानगरपालिकावर अवलंबून न राहता आपल्या सोसायटीत व घराजवळ तसेच चाळी मध्ये कीटकनाशक फवारणी करुन घ्या.सध्या पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभागालाच आता मोठा डेंग्यू झाला आहे.

    Previous articleपिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी १५ एकर भूसंपादनाचा शासन निर्णय आज मंत्रालयाकडून मान्यता
    Next articleमहाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हिंसाचारातील आरोपींची संख्या १०५ , हिंसाचारानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here