Home क्राईम कोरटकर महायुती सरकारचा सोयरा, म्हणून तो 👮 पोलिसांना सापडत नाही – मनोज...

    कोरटकर महायुती सरकारचा सोयरा, म्हणून तो 👮 पोलिसांना सापडत नाही – मनोज जरांगे पाटील

    281
    0

    पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून प्रशांत कोरटकर हा महायुती सरकारचा सोयरा आहे, म्हणूनच तो महाराष्ट्रातील पोलिसांना सापडत नाही.असं मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर चांगलाच निशाण साधला आहे.ते आज शनिवारी प्रसार माध्यमा शी बोलताना म्हणाले आहेत.तसेच कोरटकर याच्या जागी इतर कोणी असतं तर कारण नसताना त्याला तातडीने तुरुंगात टाकलं गेलं असतं असा निशाण  जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर साधला आहे.

    दरम्यान मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की.”प्रशांत कोरटकर हा सरकारचा सोयरा आहे.म्हणून तो महाराष्ट्रातील पोलिसांना सापडणार नाही.त्याच्या जागी दुसरं कोणी असतं नसतं काही तरी त्याला तुरुंगात टाकलं असतं. तर कोरटकर याच्यावर देशद्रोहाचा व मकोका आणि इतर जितके कलमं आहे.तितके त्यांच्यावर टाकायला हवेत फक्त निषेध करुन चालणार नाही.आता छत्रपती शिवराय आणि महापुरुषांवर बोलणा-यांना धडा शिवालला हवा” असं ते म्हणाले आहेत.

    Previous articleकांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय, अजित पवार यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
    Next articleपारधी समाज खोक्याच्या समर्थनार्थ तुळजापूरात रस्त्यावर उतरला

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here