पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीची संख्या ही शतक पार झाली आहे.एकूण १०५ वर ही संख्या पोहोचली आहे.आत या हिंसाचारात १० अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. दरम्यान काल शुक्रवारी आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.दरम्यान पोलिसांकडून अद्यापही गुप्तचार यंत्रणांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंसाचार कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने ते नागपूरात येऊ शकले नाही पण त्यांनी नागपूरचे पालकमंत्री यांना तातडीने घटनास्थळी पाठवले होते.आज स्वता फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आहेत.आज फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या बरोबर बैठक घेणार आहेत.या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेणार आहेत.तसेच हिंसाचार ग्रस्त भागातील सध्याची परिस्थिती व उपाययोजना यावर देखील चर्चा होणार आहे.दरम्यान आज पुन्हा दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.यात एक यूट्यूबवर माहिती प्रसारित करणाऱ्याचा संबंध आहे.तसेच या प्रकरणातील मुख्य सुत्रधार फहिम खानने जामीनासाठी सत्र न्यायालयात वकिलामार्फत अर्ज दाखल केला आहे.