पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती धाराशिव जिल्ह्यातून एक खळबळ जनक अपडेट आली असून.कारमध्ये पैशाचे बंडल उडवणारा तसेच त्याचे रिल काढणारा तसेच हरणांची शिकार करणारा तसेच बॅटच्या सहाय्याने एका व्यक्तीला मारहाण करणारा खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी 👮 अटक केली आहे.त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मध्ये पारधी समाजा च्या वतीने त्याच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलन छेडले आहे.दरम्यान आज रविवारी तुळजापूर -सोलापूर महामार्ग, तुळजापूर -धाराशिव महामार्ग व इतर प्रमुख मार्ग अडवून आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सदरच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.दरम्यान यावेळी पारधी समाजाच्या वतीने दावा करण्यात आला आहे की खोक्या उर्फ सतीश भोसले याला जाणिवपूर्वक यात अडकवण्यात आले आहे.यावेळी पारधी समाजाचे युवक कार्यकर्ते तसेच आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते .