पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) धारावीत निसर्ग उद्यान जवळ सिलेंडर घेऊन जाणा-या ट्रकला भिषण आग लागली आहे. सदरच्या घटनेत १० ते १२ सिलेंडरचा स्फोट झाला आहे. दरम्यान या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले असून दरम्यान या स्फोटा नंतर या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या आगीत इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. स्थानिक आमदार व खासदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.