पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईवरून अपडेट आली असून .आज सोमवार दिनांक २४ मार्चला नागपूरचा प्रशांत कोरटकर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.दरम्यान कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.त्यामुळे कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.दरम्यान आज थोड्याच वेळात न्या.राजेश पाटील यांच्यापुढे ही सुनावणी होईल.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान कोरटकरने केले होते.तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे ठार मारण्याची धमकी मोबाईल फोन वरून दिली होती.दरम्यान या धमकी प्रकरणी इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर येथील पोलिस स्टेशन मध्ये प्रशांत कोरटकर याच्या विरोधात फिर्याद दिल्या नंतर पोलिसांनी 👮 कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान गुन्हा दाखल झाल्या पासून कोरटकर हा फरार झाला आहे.