पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही थेट तेलंगणातून आली आहे.जवळपास एक महिन्यापासून फरार असलेला प्रशांत कोरटकर याच्या पोलिसांनी 👮 मुसक्या आवळल्या आहेत.छत्रपत्री शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते.कोरटकर हा २५ फेब्रुवारी पासून फरार झाला होता.त्यांने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना देखील फोनवरून खुनाची धमकी दिली होती.याबाबत सावंत यांनी कोल्हापूर येथील राजवाडा पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती.थोड्याच वेळात कोल्हापूर पोलिस याबाबत पोलिस पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.