पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच खळबळ जनक अपडेट आली असून. पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील एका मोठ्या कंपनीने तसा उद्योग केला आहे. दरम्यान सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील मुंढवा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. गोदरेज प्राॅपर्टीज लिमिटेडने तब्बल १७२ 🌳झाडांवर सपासप पणे कु-हाड चालवल्याचा गंभीर असा आरोप होत आहे. दरम्यान गोदरेज या कंपनीने दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी झाडे तोडण्यासाठी पुणे महानगरपालिकाच्या वतीने परवानगी घेतली होती. दरम्यान पुणे महानगरपालिकाच्या वतीने १७२ झाडांपैकी फक्त ५२ झाडे तोडण्यासाठी गोदरेज कंपनीनला परवानगी दिली होती. व याच भागात पुन्हा १२० झाडे लावण्याची अटीवर ही परवानगी दिली होती. मात्र पुणे महानगरपालिका ही झोपेत असतानाच गोदरेज प्राॅपर्टीज कंपनीने सर्व १७२ झाडे तोडून टाकली आहेत. अशी माहिती मिळत आहे. आणि याबाबतचा 🎥व्हिडिओ आता समोर आला आहे.