मुंबई २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) विधानसभाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा सदनात आज बुधवारी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनसोडे यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा मध्ये मांडला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुमोदन दिले. दरम्यान या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाऊस मध्ये म्हटले आहे की मी बनसोडे यांच्या उपाध्यक्ष निवडीचे मनपूर्वक अभिनंदन करतो.