पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच सकाळी आलेल्या अपडेट नुसार छत्तीसगढ येथील माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. दरम्यान या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज बुधवारी सकाळीच छत्तीसगढ येथील रायपूर व भिल्लाई येथील त्यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. व त्यांच्या घराची झाडाझडती घेतली आहे. यावेळी संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सीबीआयच्या अधिकारी यांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली आहे. तसेच केंद्र सरकार माझ्यावर सूडबुद्धीने सीबीआय ची छापेमारी करत आहेत. असे छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावेळी म्हटले आहे.