मुंबई २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबई मधील विधान भवनाजवळील वडाच्या झाडावर चढून एक व्यक्ती आंदोलन करत आहे. दरम्यान सदरच्या व्यक्तीला या झाडावरून खाली येण्यासाठी पोलिस👮 आणि अग्नीशमन दलाचे जवान हे मागील तीस मिनिटांपासून अथक प्रयत्न करत आहेत. पण संबंधित व्यक्ती हा प्रतिसाद देत नाही. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ५० फुटी शिडी आणून त्या द्वारे त्याला खाली घेण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. पण सदर व्यक्ती हा झाडावरून उडी मारण्याची धमकी दिली आहे. तसेच मागण्या पूर्ण होवू प्रर्यत खाली उतरणार नाही असे सदरच्या व्यक्तिने अग्निशमन दलाच्या जवानांना सांगितले आहे. सदर व्यक्ती ही बीड जिल्ह्यातील असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.