Home क्राईम तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या हिंगणे येथून सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

    तडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या हिंगणे येथून सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

    282
    0

    पुणे २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यातील हिंगणे येथे रेकॉर्डवरील व तडीपार गुंड गावठी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हिंगणे येथील शशितारा प्रतिष्ठान येथील ऑफिसच्य मागील जागेत लपलेले आरोपीला पकडून त्याच्या कडुन एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत तर दुसरा एक रेकॉर्ड वरील दुसरा तडीपार आरोपीच्या देखील हिंगणे येथील त्याच्या राहत्या घरातून मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान रिव्हॉल्वर व काडतुसेसह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव १)खंडू उर्फ पॅडी मारुती म्हस्के ( वय २२ रा. प्लॉट नं १२ शिवकृपा अपार्टमेंट हॅप्पी काॅलनी वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे) २) तर तडीपारीच्या आदेशाचा भंग करून लपून घरात रहाणा-या आरोपीचे नाव शुभम सचिन ऊफाळे ( रा. साईनगर हिंगणे खुर्द पुणे) असे आहे. दरम्यान दोन्ही आरोपींवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे. दरम्यान सदरची कामगिरी ही अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविण कुमार पाटील. पोलिस उप – आयुक्त परिमंडळ ३ पुणे शहर संभाजी कदम. सहा. पोलिस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर अजय परमार. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलिप दाईंगडे. पोलिस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे. यांच्या मार्गदर्शना खाली सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर. पोलिस अंमलदार संजय शिंदे. उत्तम तारु. आण्णा केकाण. विकास बांदल. अमोल पाटील. गणेश झगडे. विनायक मोहिते. राहुल ओलेकर. देवा चव्हाण. सागर शेडगे. विकास पांडुळे. निलेश भोरडे. यांच्या पथकाने केली आहे.

    Previous articleपुण्यात बॅनरबाजीमधून उपमुख्यमंत्री शिंदेने डिवचले! अज्ञात व्यक्तीं विरुध्द डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
    Next articleएमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here