पुणे २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान या हत्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याने आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. तसेच त्यांच्या सहित अन्य आरोपींनी देखील हत्याची कबुली दिली आहे. वाल्मिक कराड यांनी सांगितल्यानंतरच खंडणी मागितली अशी माहिती या आरोपींनी दिली आहे.
दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यातील आरोपी सुदर्शन घुले. जयराम चाटे. व महेश केदार यांनी पोलिसांच्या चौकशीत त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. यात सुदर्शन घुले हाच मास्टर माईंड समजला जात आहे. आम्ही वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुनच अवदा कंपनीला खंडणी मागितली याचा व्हिडिओ अवदा कंपनीच्या अधीकारी यांनी काढलेला व्हिडिओ🎥 पोलिस यांनी आरोपी यांना दाखवल्या नंतर त्यांनी पोपटा सारखं बोलत सगळं घटनाक्रमच पोलिसांना सांगितला आहे. व सर्व आरोप मान्य केले आहेत. तसेच मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हे अवदा कंपनीच्या खंडणीत अडथळा ठरत असल्याने त्यांचे अपहरण करून संतोष देशमुख यांना संपवण्यात आल्याची कबुली स्वतः सुदर्शन घुले याने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आता मोठ्या आकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.