Home क्राईम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणा-या कोरटकरला आज न्यायालयात हजर करणार

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणा-या कोरटकरला आज न्यायालयात हजर करणार

    79
    0

    पुणे २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाईल वरुन धमकी दिली होती. दरम्यान त्या नंतर एक महिना फरार असलेल्या कोरटकर याच्या कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा येथून मुसक्या आवळल्या होत्या त्याला राजवाड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडी आज संपत असल्यामुळे त्याला आज दुपारी पोलिस कोल्हापूर येथील न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान कोरटकर याने पोलिस जबाबात मोबाईल मधील डाटा संपूर्ण डिलीट केला आहे. तसेच मीच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती असा तपासात जबाब दिला आहे. आज पुन्हा कोल्हापूर पोलिस त्याची सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयात मागणार आहे.

    Previous articleएमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन
    Next articleकॅन्सरचे राज्यात मोफत लसीकरण, उपमुख्यमंत्री अजित पवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here