पुणे २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे येथील न-हे येथून येत आहे.किरकोळ वादातून झालेल्या वादातून मामाने मामाने भाच्याच्या छातीवर 🗡️ चाकूने वार करुन भोसकून त्याचा खून केला आहे.दरम्यान सदरची खळबळजनक घटना ही न-हे येथील कृष्णाईनगरी येथे घडली आहे.या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी 👮 तातडीने खूनप्रकरणी मामाच्या मुसक्या आवळल्या आहेत.अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.
दरम्यान खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मामाचे नाव मेघनाथ अशोक तपासे (वय ४१ रा.प्लॅट नंबर १०१ कृष्णानगर न-हे पुणे) असे आहे.दरम्यान या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन हा मुंबईवरून मामा मेघनाथ यांच्याकडे राहण्यासाठी आला होता शुक्रवारी त्याचे मामाच्या मुलासोबत भांडण झाले होते.यावेळी मामाने त्याला पट्ट्याने मारहाण केली व घरातील चाकूने गजानन याच्या छातीवर वार करुन भोसकून खून केला आहे.दरम्यान सदर खूनप्रकरणी मंगेश दत्तात्रय ओव्हाळ यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मामा मेघनाथ याच्या मुसक्या आवळल्या आहेत.याप्रकरणी पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.