पुणे २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात दिवसां दिवस मुलींमध्ये गर्भाशय अन् स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे अल्पवयीन मुलींना कर्करोगावरील लसीकरण करण्या ची घोषणा मागेच केंद्र सरकारने केली आहे.आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्या मध्ये ८ते १५ वयोगटातील मुलींना कर्करोगावरील मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे.दरम्यान या लसीकरणासाठी २ हजार रुपये खर्च येतो.ही योजना नंतर संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहे.असे पवार यांनी म्हटले आहे.