पुणे दिनांक ३०मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातूनच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.आज गुढीपाडव्याच्या दिवशी धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात चौकात चहाच्या टपरीवर दूध गरम करताना सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एक कामगाराचा आज मृत्यू झाला आहे.त्या मुळे या भागातील सर्व लोक हळहळ व्यक्त करत होते.
दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार हा चहा टपरीवर दूध गरम करताना अचानकपणे सिलिंडरचा स्फोट झाला दरम्यान स्फोट झाल्यानंतर अन्य कामगार व ग्राहक हे तातडीने बाहेर आले .मात्र एक कामगार संतोष हेगडे हा दुकानात अडकला सदर सिलिंडरचा स्फोट एवढा मोठा होता की शेजारील दुकानाला देखील आग 🔥 लागली.दरम्यान या आगीत गंभीर रित्या भाजलेल्या संतोष हेगडे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या चहाच्या दुकानाला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आहे.या प्रकरणी पुढील तपास धनकवडी पोलिस करत आहेत.