पुणे ३० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत जिलेटीन च्या सहाय्याने स्फोट घडवून आणला आहे.दरम्यान या स्फोटानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.तर पोलिसांनी 👮 दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी प्रयत्न केला आहे.तर गावातील दोन्ही समाजांच्या लोकांना शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.दरम्यान आता रमजानचे उपवास सुरू आहे.तसेच आज गुढीपाडवा सण आहे तर उदय रमजानचा सण आहे.आणि या सणाच्या दिवशीच मशिदीत स्फोट झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान बीड जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी दोन्ही समाजांच्या लोकांना शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात सांगितले आहे.