Home फायर पुण्यातील सातारा रोडवरील हाॅटेलला भीषण आग 🔥

पुण्यातील सातारा रोडवरील हाॅटेलला भीषण आग 🔥

77
0

पुणे ३१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातूनच एक खळबळजनक अपडेट आली असून.पुणे ते सातारा रोडवरील धनकवडी के के मार्केट येथे असलेल्या साहेबा या हाॅटेलला थोड्याच वेळापूर्वी साडेदहा वाजण्याच्या सुमारास 🔥 आग लागली आहे.दरम्यान हाॅटेलला आग लागताच आगीने उग्र रूप धारण केले आहे.तशा ज्वला दिसत आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली व किती नुकसान झाले हे प्रथम मिळालेल्या अपडेट मध्ये समजलेले नाही.दरम्यान या आगीच्या व्हिडिओ मध्ये रस्त्यावर लोक आग बघताना दिसत आहे.तसेच ही आग हाॅटेलच्या तळमजल्यावर लागलेली दिसत आहे. दरम्यान कालच धनकवडी येथे एका चहाच्या दुकाना मध्ये आग लागून एक कामगाराचा मृत्यू झाला होता.

Previous articleपत्नीच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याची गुढीपाडव्याच्या दिवशीच आत्महत्या
Next articleबीडच्या जेलमध्ये तुफान राडा सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here