पुणे ३१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सोमवार देशभरात सर्वत्र ईदचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे .आज साज-या होणा-या ईद- उल-फित्र सणासाठी ठिक ठिकाणी मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहे.मुबंईत.तसेच कुर्ला व वांद्रे भागात मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करुन पवित्र रमजान साजरा केला जात आहे.तसेच देशात सर्वत्र शांतता नांदावी आणि संकटे नष्ट होऊन राष्ट्रीय एकात्मता कायम नांदावी यासाठी खास दुआ पठण होत आहे.
दरम्यान आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील सर्वत्र मशिदीत मुख्य कार्यक्रमास सुरुवात प्रारंभ झाला आहे नमाजपठणापूर्विच धर्मगुरूंचे प्रवचन देखील आयोजित करण्यात आले होते.ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणा-या व्यक्तींना पाहुणचार म्हणून ईदचा खास मेनू शिरखुर्मा देण्यात येत आहे. तसेच गोडधोड पदार्था बरोबर बिर्याणी.पूलावाचा आस्वाद घेताना दिसत आहे.