पुणे २ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यातील मंगळावर पेठ येथे फ्लॅट नंबर ५२५ सदाआनंदनगर येथे रहाणा-या ३५ वर्षीय युवकाने पत्नीचा छळ करून तिला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याने तसेच मागील ७ वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ केल्याने पत्नीने रितसर तक्रार समर्थ पोलिस स्टेशन मध्ये दिल्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान या घटनेची पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनोज शिवाजी बनकर (वय ३५ रा. मंगळवार पेठ फ्लॅट नं. ५२५ सदाआनंदनगर पुणे) असे आहे. दरम्यान मागील ७ वर्षांपूर्वी ज्योती व मनोज यांचा विवाह झाला आहे. त्यांना किष्किंधा ही ७ वर्षांची मुलगी आहे. दरम्यान मनोज हा पुण्यात डिजेचे काम करतो तर ज्योती ही इव्हेंट मॅनेजमेंट होम वर्क करत आहे. दरम्यान मनोज याचे बाहेर बाहेरील महिला सोबत प्रेम संबंध आहे. त्यावर ज्योती हिने मनोजला या बाबतीत विचरणा केली असता त्याने ज्योतीला बेदम मारहाण केली. याबाबत तसेच त्याच्या बाहेरील प्रेमाबद्दल ज्योतीच्या आई वडील यांनी समजावून सांगितले. तरी त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही. तो घरी पैसे प्रपंचाकरिता देत नसे तर ज्योती ह्या स्वतः होमवर्क करुन स्वतः तसेच पती व मुलगी यांचा उदरनिर्वाह करत आहेत. तरी देखील पती हा स्वतः बाहेरख्याली असून तोच उलटा ज्योती वरच तिच्या चारित्र्य बाबत संशय घेऊन तिला सतत मारहाण करत असल्याने त्यांनी पती मनोज यांच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पती मनोज याच्या विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ कलम ८५.११५.(२) ३५२.व ३५१(२) नुसार एफ आर क्रमांक ६४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी मनोज मनोज शिवाजी बनकर याला पत्नी ज्योती हिची छळवणूक केल्या बदल त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास हेड पोलिस काॅन्सटेबल गणेश वालकर हे करीत आहेत.