पुणे ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पहाटेच्या सुमारास पुण्यातील कोथरूड येथील ब्रिजवर भरघाव वेगाने येणारी दुचाकी ब्रिजच्या कठाड्याला धडकून झालेल्या अपघातात दोन युवक हे गंभीर रित्या जखमी झाले त्यांना उपचारा करीता रुग्णालय दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे . सदरचा अपघात हा. पौड फाट्यावरील ब्रिजजवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
दरम्यान या दुचाकी अपघातात ठार झालेल्या दोन जणांची नावे १)सर्वेश गोपाळ पाटील (वय २० ) २) पुष्कर सुधाकर चौधरी (वय १९ रा. तुरक गुप्हाडा जिल्हा. बु-हाणपूर मध्यप्रदेश)अशी आहेत. दरम्यान या घटनेबाबत पोलिस सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेजण मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील पौड फाट्यावरील ब्रिजवरुन बाईकवरून भरघाव वेगाने येत असताना त्यांची बाईक ही ब्रिजच्या कठाड्याला धडकून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारा करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास कोथरूड पोलिस करत आहेत.